युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आगामी २५ व २६ ऑगस्ट रोजी संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्याच्या दरम्यान ते शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
शिवसेना नेते व विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौऱ्याची सुरुवात २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता सिल्लोड विधानसभा मतदार संघात होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघात संवाद साधला जाणार आहे.
२६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पैठण विधानसभा मतदार संघात, दुपारी १२.१५ वाजता गंगापूर – रत्नपुर विधानसभा मतदार संघात, दुपारी २ वाजता वैजापूर विधानसभा मतदार संघात आणि सायंकाळी ६ वाजता कन्नड विधानसभा मतदार संघात आदित्य ठाकरे हे शिवसेना पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
हा दौरा आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे, जिथे आदित्य ठाकरे पक्षाच्या आगामी रणनीतीवर चर्चा करतील आणि स्थानिक समस्यांवर मतदारांशी संवाद साधतील.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*