छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर परिसरातील गजानन नगर येथे आज पहाटे घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले. घरात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत मोरे कुटुंबातील सुनंदा मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास घरात अचानक आग लागल्याचे लक्षात येताच कुटुंबातील सदस्यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. मात्र, वरच्या मजल्यावर असलेल्या सुनंदा मोरे या बाहेर पडू शकल्या नाहीत. आग वेगाने पसरल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

स्थानिक नागरिकांनी घरासमोरून जाणाऱ्या हायटेन्शन वीजवाहिनीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, वेळेत वीजपुरवठा खंडित न केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक अशोक दामले आणि पुष्पा निरपगारे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांना धीर दिला व मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे गजानन नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,162 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क