छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) प्रकल्पात उद्योगांकडून वाढत्या प्रतिसादामुळे बिडकीन परिसरातील आणखी ५२० एकर जमीन निवासी वापरातून औद्योगिक वापरासाठी रूपांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मोठ्या गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेले सलग भूखंड उपलब्ध होणार असून, ऑरिकमध्ये नव्या उद्योगांना चालना मिळणार आहे.

शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र हे देशातील महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहर प्रकल्पांपैकी एक मानले जाते. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शेंद्रा आणि बिडकीन या दोन्ही औद्योगिक नोडमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे लक्ष ऑरिककडे वेधले गेले आहे.

ऑरिकमध्ये आतापर्यंत ३३२ भूखंडांचे वाटप करण्यात आले असून, त्यांचे एकूण क्षेत्रफळ ३ हजार ४३४ एकर आहे. यापैकी ३ हजार २८४ एकर जमीन औद्योगिक वापरासाठी देण्यात आली आहे. बिडकीन औद्योगिक पट्ट्यात अनेक नामांकित कंपन्यांनी गुंतवणूक केली असून, शेंद्रा नोडमध्ये ह्योसंगसह विविध उत्पादन क्षेत्रातील उद्योग कार्यरत आहेत.

सध्या ऑरिककडे सुमारे ७७१ एकर औद्योगिक जमीन उपलब्ध असून, सुमारे २ हजार ३९ एकर जमीन निवासी वापरासाठी राखीव आहे. मात्र, निवासी भूखंडांना तातडीने मागणी नसल्याने आणि औद्योगिक भूखंडांची मागणी सातत्याने वाढत असल्याने बिडकीनमधील ५२० एकर जमीन औद्योगिक वापरासाठी वर्गीकृत करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ८ हजार एकर जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेलाही लवकरच गती दिली जाणार असल्याची माहिती ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. डी. मलिकनेर यांनी दिली. यामुळे परिसरातील औद्योगिकीकरणाला आणखी वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

363 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क