शेअर मार्केटमधून अधिक नफा मिळवण्याचे आमिष दाखवून ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी संदीप रायलवार (वय ५०, रा. एन-२) यांना फसवणुकीचा फटका बसला असून, याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आरोपी मेलीस आणि रामजी (पत्ता व वय माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती अशी की, संदीप रायलवार यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरून अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. त्या ग्रुपमध्ये शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवण्याची खोटी माहिती देण्यात येत होती. अनेकांना नफा झाल्याचे खोटे स्क्रीनशॉट्स पाठवले जात होते, ज्यामुळे संदीप यांनी त्यावर विश्वास ठेवला.
संदीप यांनी मेलिसा नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला, ज्याने त्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये सामील होण्यास सांगितले. त्या ग्रुपमध्ये एंजल बीजी नावाच्या अॅपवर पैसे भरण्याची माहिती दिली गेली आणि खात्याचा क्रमांक प्रदान करण्यात आला. विश्वासाने संदीप यांनी ४ लाख १४ हजार रुपये त्या खात्यावर ट्रान्सफर केले.
दुसऱ्या दिवशी संदीप यांना ९ लाख रुपयांचा नफा झाल्याचे दर्शवले गेले. पण, नफा काढण्यासाठी विचारणा केली असता, त्यांना १० लाख रुपये अधिक भरण्याची अट घालण्यात आली. यामुळे संदीप यांना फसवणुकीची जाणीव झाली आणि त्यांनी तात्काळ मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन डाके करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*