छत्रपती संभाजीनगर : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी छत्रपती संभाजीनगर शहर सज्ज झाले असून, सोमवारी (दि. १४) घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये बाप्पाचे थाटामाटात आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी शहर पोलिसांनी व्यापक नियोजन केले आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी-अंमलदारांसह राज्य राखीव पोलिस दलाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यंदा शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह वाढला असून, अंदाजे ९०० ते ९५० सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये शहरात ८११ सार्वजनिक मंडळे होती. यंदा त्यात सुमारे १०० ते १५० मंडळांची वाढ अपेक्षित आहे. तसेच शहरातील तब्बल १ लाख ६० हजार ते १ लाख ७० हजार घरांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे. जिल्हा गणेश महासंघासह शहरात एकूण सात गणेश महासंघ कार्यरत आहेत.

गणेशोत्सव काळातील बंदोबस्ताची जबाबदारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, परिमंडळ-२ चे उपायुक्त रत्नाकर नवले, गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव आणि शर्मिष्ठा घारगे यांचा समावेश आहे.

त्यांच्या देखरेखीखाली ७ सहायक पोलिस आयुक्त, ३३ पोलिस निरीक्षक, १०५ एपीआय/पीएसआय, १,५८६ पोलिस अंमलदार, ५०० होमगार्ड, एसआरपीएफच्या तीन कंपन्या आणि जलद कृती दलाची एक कंपनी तैनात राहणार आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातही पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागात १९ पोलिस निरीक्षक, ३६ सहाय्यक निरीक्षक, ७६ उपनिरीक्षक, १,५०० महिला व पुरुष पोलिस अंमलदार, एसआरपीएफची एक कंपनी, ७०० होमगार्ड आणि ५० नवप्रविष्ट पोलिस शिपाई तैनात असणार आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

154 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क