छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवातील बारा दिवसांच्या उत्साहानंतर आता गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. आज रोजी होणाऱ्या मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यंदा शहरातील ९४१ सार्वजनिक गणेश मंडळांसह सुमारे १ लाख ६५ हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

सुरक्षेचा भाग म्हणून ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरावर नजर ठेवली जाणार आहे. परवानगीशिवाय ड्रोन उडविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अँटी ड्रोन गनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी १२ विशेष टास्क फोर्स सज्ज ठेवण्यात आले असून नियंत्रण कक्षात पाच स्ट्राइकिंग फोर्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक, तसेच तीन बॉम्ब शोधक व नाशक पथकेही तैनात राहणार आहेत.

विसर्जनाच्या दिवशी शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद किंवा वळविण्यात येणार आहे. संस्थान गणपती, शहागंज, भडकलगेट, सिटीचौक, गुलमंडी, पैठणगेट, जिल्हा परिषद मैदान परिसरासह विविध मार्गांवर वाहनांना निर्बंध राहतील.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

200 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क