MIDC RAID ON GANANAN AGRO – ILLEGAL RATION STOCK SEIZED
छत्रपती संभाजीनगर : शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत शासकीय स्वस्त धान्याचा शेकडो टन साठा जप्त केला आहे. एमआयडीसी वाळुज परिसरालगत असलेल्या करोडी गट नंबर परिसरातील गजानन ऍग्रो सेल्स कार्पोरेशन या कंपनीवर ही कारवाई करण्यात आली. या कंपनीत गेल्या आठ ते दहा वर्षांपासून शासकीय स्वस्त धान्यावर प्रक्रिया करून त्याचे पॉलिशिंग करून विविध प्रकारचे तांदूळ तयार केले जात होते. त्यानंतर हे तांदूळ राज्यभर आणि परराज्यात उच्च किमतीत विकले जात होते.
या धान्याच्या काळ्या बाजाराची माहिती छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना मिळताच, झोन-1 चे डीसीपी नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी ताफा घेऊन कंपनीवर छापा टाकत हजारो कोटींचा माल जप्त केला.
ही कारवाई महाराष्ट्रातील धान्य काळाबाजाराच्या मोठ्या प्रकरणांपैकी एक मानली जात आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या गैरव्यवहारात आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
गजानन ऍग्रो सेल्स कार्पोरेशनच्या या मोठ्या गैरप्रकारामुळे अनेक गरिबांना मिळणारे स्वस्त धान्य व्यापाऱ्यांच्या घशात जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांची ही कारवाई राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*