छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बस स्थानकाजवळ एका दुचाकीस्वाराने थेट बसची चावी काढून चालकाला शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सिडको बस स्थानकातून महामंडळाची एक बस अकोल्याच्या दिशेने निघत असताना, एका मोपेड दुचाकीस्वाराने अचानक बसच्या डाव्या बाजूला येऊन धडक दिली. या अपघातानंतर संतप्त दुचाकीस्वाराने आपल्या दोन नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर तिघांनी मिळून बसचालकाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि चक्क बसची चावी काढून पळ काढला.

वाहतूक कोंडी, बसला धक्का देऊन पार्किंग

बसची चावी काढून घेतल्यामुळे बस रस्त्यातच थांबली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. या गोंधळामुळे इतर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला. काही वेळानंतर कर्मचाऱ्यांनी मिळून बसला धक्का देत स्थानकात उभे केले.

तिघांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी बस चालक राजघर सुखदेव वाघोदकर यांच्या तक्रारीवरून रविंदर सिंग बेताब सिंग कौर, गगन सिंग आणि तेजपाल सिंग सहानी यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे.

सरकारी कामात अडथळा हा गंभीर गुन्हा

सरकारी कर्मचारी किंवा सार्वजनिक सेवा अडवणे हा कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो. या घटनेनंतर बस चालक संघटनांनीही सरकारी बस चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत, कठोर कारवाईची मागणी केली आहे.

🚨 पुढील तपास एमआयडीसी सिडको पोलीस करत असून आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EatQ9jy0BXO4VEa0In93E6

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,908 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क