Ajintha Bank Scam: Ex-MLA Subhash Zhambad Arrested

अजिंठा अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. अखेर त्यांनी पहाटे पोलीस आयुक्तालयात आत्मसमर्पण केले. मेडिकल तपासणी झाल्यानंतर दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अजिंठा अर्बन बँकेत 2006 ते 2023 या कालावधीत तब्बल 97 कोटी 41 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन सीईओ प्रदीप कुलकर्णी आणि बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राजकीय वर्तुळात प्रतिष्ठित असलेल्या माजी आमदार झांबड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने ते फरार झाले होते. शहरातील विविध भागांमध्ये आणि काही सोहळ्यांमध्ये त्यांची उपस्थिती दिसून आली, मात्र आर्थिक गुन्हे शाखेला ते हाती लागले नाहीत. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी झांबड यांनी अजिंठा बँकेचे 60 कोटी रुपये परत भरल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली होती. मात्र, संपूर्ण रक्कम वसूल करण्यासाठी आणि प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी त्यांच्या अटकेची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहाटे पोलीस आयुक्तालयात हजर झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीसाठी अर्ज केला जाणार आहे. घोटाळा उघडकीस आल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी झांबड यांना अखेर ताब्यात घेण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,321 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क