uddhav-sena-exodus-10-ex-corporators-join-shinde-group

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लागलेली गळती थांबायला तयार नाही. शुक्रवारी (८ फेब्रुवारी) उद्धव सेनेला आणखी एक मोठा धक्का बसला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे १० माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले.

शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये स्थायी समितीचे माजी सभापती मोहन मेघावाले, माजी सभागृह नेता किशोर नागरे, गटनेता मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक अनिल जयस्वाल, रूपचंद वाघमारे, माजी नगरसेविका स्वाती नागरे, ज्योती वाघमारे, मीना गायके, ज्योती पिंजरकर आणि सीमा खरात यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या माजी नगरसेवकांचा १५ दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, गटातील अंतर्गत मतभेदांमुळे हा प्रवेश लांबणीवर पडला होता.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाने आपल्या नगरसेवकांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. शिवसेना नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी माजी नगरसेवकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. मात्र, या प्रयत्नांनंतरही गळती रोखण्यात यश आले नाही.

१५ दिवसांपूर्वीच पूर्व विधानसभा शहर संघटक विश्वनाथ स्वामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता आणखी १० माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. मुंबईतील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मुक्ताई बंगल्यावर या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल आणि युवा सेनेचे ऋषिकेश जैस्वाल उपस्थित होते.

या नव्या इनकमुळे शिंदे गटाची ताकद आणखी वाढली असून आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,799 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क