Traffic-Diversion-Cidco-Harsul-T-Point
छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट या मार्गावरील रस्ता काँक्रीटीकरण व जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
मापारी इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळातर्फे सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट मार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. तसेच, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे आंबेडकर चौक ते रिलायन्स पेट्रोल पंप या दरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.
असा आहे वाहतुकीत बदल:
➡ सिडको बसस्थानकाकडून हर्सूल टी पॉइंटकडे जाणारी वाहतूक – देवगिरी बँकपासून आंबेडकर चौकापर्यंत सर्व्हिस रोडने वळवण्यात आली आहे.
➡ हर्सूल टी पॉइंटकडून सिडको बसस्थानकाच्या दिशेने येणारी वाहतूक – आंबेडकर चौक (राँग साईड) ते रिलायन्स पेट्रोल पंपमार्गे डिव्हायडरपासून मूळ रस्त्यावर येईल.
वाहनचालकांसाठी सूचना:
या मार्गावर एकेरी वाहतूक असेल, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहनचालकांनी नियोजित मार्गाचा वापर करावा.
सर्व नागरिकांनी व वाहनचालकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) धनंजय पाटील यांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*