Employees Swindle Lakhs from Companies and Escape

छत्रपती संभाजीनगर : ज्यांनी नोकरी दिली, त्याच कंपनीची लाखोंची फसवणूक करून दोन कर्मचाऱ्यांनी पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. सतीश त्र्यंबक त्रिभुवन (रा. भीमशक्ती नगर) आणि राजेश कांतीलाल जैन (५५, रा. श्रेयनगर) यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जैनने १२.७४ लाख रुपये केले लंपास

राजेश जैन हे सत्यम् पॉलिमेट्स प्रा. लि. या कंपनीत डिसेंबर २०२२ पासून सेल्स विभागात काम करत होते. त्यांच्यावर ग्राहकांकडून ऑर्डर घेणे आणि थकबाकी वसूल करण्याची जबाबदारी होती. मात्र, त्यांनी कंपनीत रुजू होताच ग्राहकांकडून मिळालेली रक्कम स्वतःच लंपास करणे सुरू केले. वर्षभरात त्यांनी तब्बल १२ लाख ७४ हजार रुपये अपहार केला.

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर जैन यांनी व्याजासह रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले, मात्र नंतर संपर्क बंद केला. अखेर, कंपनीचे व्यवस्थापक नकुल चांडक यांनी पोलिस आयुक्तालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर राजेश जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रिभुवनने ९.७१ लाख रुपयांची केली फसवणूक 

सतीश त्रिभुवन जीवनदीप एड्यूमीडिया कंपनीत सेल्स विभागात कार्यरत होते. ही कंपनी शैक्षणिक पुस्तके, नोटबुक, आणि ऑडिओ-व्हिडिओ शैक्षणिक साहित्य विकते. त्रिभुवनकडे शहरासह पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, वाळुज, आणि रांजणगाव परिसरातील शाळांची थकबाकी वसूल करण्याची जबाबदारी होती.

कंपनीने आदेश दिला होता की रक्कम केवळ धनादेशाद्वारे स्वीकारावी. मात्र, २०२१ मध्ये कंपनीने शाळांना संपर्क साधला असता, त्रिभुवनने थकबाकी वसूल करून ती स्वतःच्या बँक खात्यावर वर्ग केल्याचे उघड झाले. एकूण ९.७१ लाख रुपयांचा अपहार करून त्यांनीही कंपनीला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, मात्र ते न करता पोबारा केला.

या प्रकारानंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत असून, आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,104 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क