Eve-teasers beaten and locked up by locals in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर  आईसोबत मोमोज खाण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार वाळुज बजाजनगरमधील गोरख वाघ चौकात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. मात्र, या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी सजगता दाखवत टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आरोपींना चोप देत जवळच्याच दुकानात कोंडले आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

संबंधित मुलगी आईसोबत खाद्यपदार्थ खाण्यासाठी बाहेर गेली होती. यावेळी काही टवाळखोरांनी तिच्याकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली. मुलीच्या आईने सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र, नंतर तेच टवाळखोर त्यांच्या जवळ जाऊन पुन्हा छेड काढू लागले. यावर संतप्त झालेल्या आई व मुलीने त्यांना जाब विचारला. त्यांचा आरडाओरड ऐकताच परिसरातील स्थानिकांनी धाव घेतली आणि टवाळखोरांना पकडले.

जमावाने आरोपींना मारहाण करत एका दुकानात कोंडून ठेवले आणि तातडीने पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौघांना ताब्यात घेतले. त्यापैकी तिघे अल्पवयीन असून एक जण प्रौढ असल्याचे समजते. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेनंतर स्थानिकांनी अशा टवाळखोरांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,667 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क