sidko-lootmar-tarunala-marhan-ani-39000chi-loot
छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी, देवगिरी बँकेजवळील मैदानात दोन अनोळखी इसमांनी एका तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. ही घटना काल (१४ मार्च) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
फिर्यादी गोविंद सिताराम बहुरे (रा. मयूरनगर, एन-11, हडको) हे लघुशंकेसाठी थांबले असता दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याकडे माचिस मागितली. फिर्यादी यांनी माचिस नसल्याचे सांगताच आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यांना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील मोबाईल, मोपेडच्या डिक्कीत ठेवलेले २०,००० रुपये रोख, तसेच हातातील चांदीचे ब्रासलेट जबरदस्तीने काढून घेतले.
डोक्यात विट मारून गंभीर जखमी
फिर्यादीला लुटल्यानंतर आरोपींनी त्याच्या डोक्यात विट मारून गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुटमारीत फिर्यादीचे एकूण ३९,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*