पैठण : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यामध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अमोल लक्ष्मण हजारे (रा. नारळा, पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पैठण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांचा तपास सुरू
नाथसागर धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यात मृतदेह पडल्याची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे आणि पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मृत्यू संशयास्पद – शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
या व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली.
पैठण पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून, मृत्यूचे कारण आणि यामागील संभाव्य कारणांचा शोध घेतला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*