गॅरेज मालकाचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान
गजानन राऊत: प्रतिनिधी / वाळूज : एमआयडीसी वाळूज परिसरातील प्लॉट नंबर 10, गट नंबर 28 मध्ये असलेल्या बाळूमामा ऑटोमोबाईल गॅरेजला शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या पाच ते सात मोटारसायकली जळून खाक झाल्या. या आगीत गॅरेज मालक सागर निकम यांचे सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या आगीत गॅरेजच्या शेजारी असलेल्या अभिषेक एंटरप्रायझेस या कंपनीलाही फटका बसला असून, कंपनीतील कार्यालयीन साहित्य जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या दुर्घटनेत गॅरेज मालकाचे मोठे नुकसान झाले असून, स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अधिक तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*