छत्रपती संभाजीनगर : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गंगापूर तालुक्यातील वैरागड येथे दोन युवकांचा तर माळीवाडा येथे एका युवकाचा मृत्यू झाला. या दुहेरी दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

वैरागड येथे दुहेरी मृत्यू

गंगापूर तालुक्यातील वैरागड येथे १६ मार्च रोजी ऋषिकेश सोमनाथ वाकचौरे आणि गौरव प्रकाश शेजवळ (वय १७, दोघेही रा. वैरागड) हे गावातील तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना ते खोल पाण्यात बुडाले. गावकऱ्यांनी शोधकार्य हाती घेतल्यावर सायंकाळी त्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गावात शोककळा पसरली असून त्यांच्या पार्थिवावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

माळीवाडा येथे युवकाचा मृत्यू

त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील वंजारवाडी येथील अजय संजय मिसरे (वय १७) याचा तलावात बुडून मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. शोधादरम्यान, शरणापूर पाझर तलावाजवळ त्याचे कपडे आणि बूट आढळले. स्थानिक ग्रामस्थ, दौलताबाद पोलिस आणि बचाव पथकाने तलावात शोधमोहीम राबवली. अखेर अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात आले.

अजयला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

या दुहेरी घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली असून गावकरी आणि कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,528 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क