गजानन राऊत/ प्रतिनिधी वाळूज: पतीपासून वेगळी प्रियकरासोबत राहणाऱ्या ३४ वर्षीय विवाहितेवर चौघांनी चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना वाळूजमहानगर हद्दीत घडली असून नराधमांनी सहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर देखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात चौघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित पूजाने (पीडित महिलेचे बदललेले नाव) दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, इयत्ता ८ वीमध्ये असताना २००७ साली शाळेची एक दिवसाची सहल सिद्धार्थ उद्यानात गेली होती. त्यावेळेस प्रियकर संजय (बदललेले नाव) याच्याशी ओळख झाली. आमचे प्रेमप्रकरण सुरू झाले. दोघांचे प्रेमप्रकरण आई-वडिलांना माहिती झाल्याने २०१० मध्ये पूजाचे लग्न एका तरुणासोबत लावून दिले. पूजा नवऱ्यासोबत दोन ते तीन वर्षे वाळूजमहानगर परिसरात राहिली. तिला नवऱ्यासोबत राहायचे नसल्याने ती प्रियकर संजय सोबत २०१२ मध्ये पळून गेली. प्रियकरासोबत बजाजनगर येथे ५ ते ६ वर्षे विवाह न करता (लिव्ह इन प्रमाणेच) राहिली. तेव्हा संजयच्या घरी त्याची आई, मोठा भाऊ, त्याची पत्नी, दुसरा भाऊ, त्याची पत्नी असे सर्व एकत्र राहायचे. संजयपासून पूजाला १३ वर्षाचा मुलगा व ६ वर्षाची मुलगी आहे. ते बजाजनगर येथे सर्व एकत्रित २०१२ ते २०१८ पर्यंत राहिले. त्यानंतर संजयचे स्वतःचे घर रांजणगाव येथे होते. तेथे ते २०१८ ते २०२४ पर्यंत राहिले. २०२० मध्ये लक्ष्मीच्या सणाला संजयचा मोठा भाऊ घरी आला व सण झाल्यानंतर रात्री त्याने घरातले सर्व झोपलेले असताना पूजा सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे सर्व संजयला माहिती होते. त्याची या गोष्टीला संमती असल्याने पूजावर त्याने जबरदस्ती केली. त्या दोघांच्या संगनमताने हे सर्व होत होते. तसेच त्याने त्याच वर्षी पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. २०२२ मध्ये संजयचा चुलत भाऊ हा एका रविवारी रांजणगाव येथील घरी मुक्कामी आला. त्या रात्री संजय हा घरीच असताना त्याने पूजासोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला तेव्हा संजय हा त्याला काहीच बोलला नाही. त्यानंतर त्याने जातीवाचक शिवीगाळ केली नंतर संजयने मारहाण करणे चालू केले. पूजाला आई-वडिलांकडे जाण्यासाठी तोंड नसल्याने त्यांना या गोष्टी ती सांगू शकत नव्हती. ते घरात घेणार नाही, याची पूजाला भीती होती. नवऱ्याचे घर तिने स्वतःहून सोडलेले होते.
या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.
मुलीच्या नावाने ब्लॅकमेल
१४ मार्च २०२४ ला रांजणगाव येथील रूमवर सायंकाळी ७ वा संजयच्या तिसऱ्या क्रमांकाच्या भावाने पूजाच्या मुलीचे अंतरवस्त्र काढत म्हणाला की, मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध बनवू दे, नाही तर मी तुझ्या मुलीचे जीवन बरबाद करेन’, तेव्हा नाईलाजाने त्याचे ऐकावे लागले. तेव्हा संजयच्या भावाने जबरदस्तीने अत्याचार केला आणि त्याचा व्हिडीओ बनवला. संजयच्या भाऊ क्रमांक १, भाऊ क्रमांक २, चुलतभाऊ क्रमांक ३ व संजय हे चौघे सलग चार वर्षे अत्याचार करत राहिले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*