डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३ आणि १४ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात विविध ठिकाणी मिरवणुका, रॅली आणि अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्र येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी काही प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, तसेच पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

१३ एप्रिल २०२५ – संध्याकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत वाहतूक बंद:

  • मिल कॉर्नर ते सिटी क्लब

पर्यायी मार्ग (१३ एप्रिलसाठी):

  1. जळगाव कडून येणारी वाहने – हर्सुल टी > जळगाव टी > जालना रोड > अमरप्रित चौक > महावीर चौक
  2. दिल्लीगेटकडून येणारी वाहने – सिटी क्लब > महानगरपालिका > टाऊन हॉल उड्डाणपुलाखालून > मकईगेट > बेगमपुरा > विद्यापीठ मार्ग
  3. मध्यवर्ती बसस्थानकाकडून – मिलकॉर्नर > कार्तिकी चौक > महावीर चौक > सेशन कोर्ट > क्रांतीचौक > आकाशवाणी > जळगाव टी

१४ एप्रिल २०२५ – सकाळी १०.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत वाहतूक बंद:

  • महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते अमरप्रित चौक
  • गोपाल टी > क्रांती चौक > सिल्लेखाना > पैठणगेट > गुलमंडी > सुपारी हनुमान मंदिर > सिटीचौक > जुना बाजार > मुख्य पोस्ट ऑफिस > भडकल गेट
  • शहागंज गांधी पुतळा > सराफा > सिटीचौक
  • औरंगपुरा पोलीस चौकी > बाराभाई ताजिया
  • मिलकॉर्नर > सिटी क्लब
  • सिडको परिसरातील मार्ग – एन-१२, एन-९, अयोध्या नगर, शिवनेरी कॉलनी, एन-७ शॉपिंग सेंटर मार्ग एकेरी करण्यात येईल

पर्यायी मार्ग (१४ एप्रिलसाठी):

  1. जळगाव व जालना मार्गावरील वाहने – हर्सुल टी > जालना रोड > अमरप्रित चौक > दर्गा चौक > गोदावरी टी > रेल्वे स्टेशन चौक
  2. शहानुरवाडी > भाजीवाली बाई पुतळा > गाडे चौक > देगिरी कॉलेज > कोकणवाडी
  3. सावरकर चौक > निराला बाजार > औरंगपुरा
  4. चिल्लीपुरा > महानगरपालिका कार्यालय मार्ग
  5. दिल्लीगेट > सिटी क्लब > टाऊन हॉल उड्डाणपुलाखालून > विद्यापीठ मार्ग

महत्वाचे:

  • पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मुभा
  • बंद मार्गांवर मिरवणुकीतील देखावे व शासकीय मिरवणूक वाहनांना अपवाद
  • नियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,284 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क