छत्रपती संभाजीनगर : शहराच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्र. DD 01 U 9956) नियंत्रण सुटल्याने हॉटेलच्या कंपाउंडला जोरदार धडक दिली. कंपाउंड तोडत ट्रक थेट शेजारील गोठ्यात घुसल्याने मोठा अनर्थ घडला. या अपघातात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला असून, एक शेळी व एक म्हैस गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना रविवारी (८ जून) पहाटे चारच्या सुमारास हर्सूल परिसरातील कचरा डेपो शेजारी घडली.

हर्सूल पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्यालगत असलेल्या पक्क्या विटांच्या कंपाउंडवर आदळला. त्या ठिकाणी एका हॉटेलचे बांधकाम सुरू असल्यामुळे सुदैवाने कोणीही उपस्थित नव्हते. मात्र, कंपाउंड तोडून ट्रक शेजारी असलेल्या गोठ्यात शिरला आणि तिथे मोठे नुकसान झाले.

या गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या जागीच ठार झाल्या, तर एक शेळी आणि एक म्हैस गंभीर जखमी झाली. जखमी जनावरांवर तातडीने उपचार करण्यात आले. यावेळी योगेश पहाडिया यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. गोठ्याचे मालक गौरव औताडे यांनी सांगितले की, “घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच आमचे कुटुंबीय त्या ठिकाणी जाणार होते, पण थोडक्यात मोठा अनर्थ टळला.”

दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी ट्रकचालक योगेश भीमराव पगारे (रा. वडीगोद्री, ता. अंबड) याच्याविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,571 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क