छत्रपती संभाजीनगर : शहरात एक धक्कादायक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. रोजगार हमी योजनेचा फॉर्म भरून देतो, अशी थाप मारून एका अज्ञात भामट्याने ६० वर्षीय वृद्धेला विश्वासात घेत तब्बल ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना ६ जून रोजी सकाळी १०.१५ वाजता रेल्वेस्टेशन समोरील चौकात घडली.

याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार शंकुतला सदाशिव गायकवाड (वय ६०, रा. अमोदी हिल, बेगमपुरा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आपली मुलगी उमा पवार हिला जनशताब्दी एक्सप्रेसने नाशिकला सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. मुलीला ट्रेनमध्ये बसवून परत येत असताना स्टेशनबाहेर एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या मागे लागला.

त्याने “रोजगार हमी योजनेचे फॉर्म भरले जात आहेत, तुम्हालाही भरायचा आहे का?” असे विचारत शंकुतला यांना जी.एम. प्लाझा हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला नेले. तेथे त्याने, “फॉर्म भरण्यापूर्वी दागिने काढून ठेवा,” असे सांगितले. विश्वासाने शंकुतला यांनी कर्णफुले (२ ग्रॅम), ३० मणीची दीड ग्रॅम पोत आणि ८० मणीची ७.५ ग्रॅम वजनाची पोत, असे एकूण ७५ हजार रुपयांचे दागिने काढून दिले. त्यानंतर भामटा तेथून पसार झाला.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, सुरक्षा कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

791 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क