छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर झालेल्या दरोड्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, चोरीस गेलेल्या ३२ किलोंपैकी तब्बल ३०.३४१ किलो चांदी पोलिसांनी पडेगाव येथून हस्तगत केली आहे. ही चांदी अमोल खोतकरच्या चारचाकी वाहनातून मिळून आली असून, मुख्यत्वे चांदीची भांडी या मुद्देमालात आहेत.

विशेष म्हणजे, ही माहिती अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकर हिच्या चौकशीतून मिळाल्याने पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेने रोहिणीची अनेकवेळा चौकशी केली होती. मात्र तिच्या जबाबांमध्ये सतत विसंगती आढळून येत होती. अखेर ९ जून रोजी झालेल्या चौकशीत तिने कबूल केले की, अमोलने एन्काऊंटरच्या दोन दिवस आधी गाडीतील बॅग्सबाबत तिला माहिती दिली होती.

त्यानुसार पोलिस पथकाने पडेगाव येथील एका गॅरेजवर छापा टाकला. तिथे अमोलची कार (MH 43 AF 3246) आढळून आली. टॉमीच्या साहाय्याने गाडीची डिक्की उघडली असता, त्यामध्ये तीन बॅग्स सापडल्या आणि त्यात मोठ्या प्रमाणात चांदी असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, याच प्रकरणात आणखी एक अटक करण्यात आली आहे. सूर्यकांत उर्फ सुरेश मुळे (वय ३९, रा. गांधीनगर, अंबाजोगाई) याला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. तपासात समोर आले की, आरोपी सुरेश गंगणेसोबत त्याचा संपर्क होता. गंगणेकडून त्याने २० तोळे सोने विकत घेऊन ते विकले आणि त्यातून लक्झरी कार खरेदी केली होती.

सध्या सुरेश मुळे याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

5,872 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क