छत्रपती संभाजीनगर : शहरातील काळा गणपती मंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे एकाचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली होती. यासंदर्भातील अधिकृत माहिती आता पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली असून मृत आणि जखमींची नावे स्पष्ट झाली आहेत.

ही घटना सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. प्रशांत एकनाथ मगर (वय ३०, रा. सिडको) हा गारखेडा येथील क्रीडा संकुलातून टेनिस खेळून आपल्या MH-20-HH-0746 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने घरी जात होता. दरम्यान, काळा गणपती मंदिराजवळ टर्न घेताना त्याने निष्काळजीपणे व भरधाव वेगात कार चालवली आणि थेट रस्त्यावर असलेल्या लोकांवर गाडी घातली.

या अपघातात काळा गणपती मंदिराचे सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (वय ७०) हे गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. तर, मनीषा विकास समधाने (वय ४०) व विकास समधाने (वय ५०) या दाम्पत्यास एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय रवींद्र भगवंतराव चौबे (वय ६५) आणि श्रीकांत प्रभाकर राडेकर (वय ६०) या दोघांवर मिनी घाटीत उपचार सुरू असून त्यांचे नातेवाईक त्यांना इतर रुग्णालयात हलवत आहेत.

एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी मंदिर परिसरात वाहतूक नियंत्रण, गतिरोधक आणि बंदोबस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

7,246 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क