छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या झाल्टा फाटा, बिड बायपास परिसरातील हॉटेल अंबिका लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग येथे बेकायदेशीर देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कारवाई करत ४ महिलांची सुटका केली. या प्रकरणी हॉटेल मॅनेजर आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स.पो.नि. सरला गाडेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डीवायएसपी पूजा नागरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ४ जुलै रोजी सापळा रचला. बनावट ग्राहक पाठवून पाळत ठेवण्यात आली. हॉटेल व्यवस्थापक सुभाष फकिरा राठोड (वय 49) याने डमी ग्राहकाला 1000 रुपये स्वीकारून खोली क्रमांक 106 मध्ये पाठवले. काही वेळातच एक महिला रूममध्ये आल्यावर डमी ग्राहकाने इशारा दिल्यानंतर पथकाने धाड टाकत तिची सुटका केली.

त्यानंतर इतर खोल्यांची तपासणी करताना आणखी ३ पिडीत महिला सापडल्या. संबंधित महिलांचा आर्थिक व सामाजिक असहायतेचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून बळजबरीने देहव्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारात हॉटेल मालक विश्वास शिंदे (वय 51) याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या दोघांविरोधात चिकलठाणा पोलिस ठाण्यात अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ५७,९९० रुपयांचा मुद्देमाल, मोबाईल फोन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून, पोलीस अधिकाऱ्यांनी अशा बेकायदेशीर कारवायांविरोधात ठोस पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

5,554 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क