छत्रपती संभाजीनगर : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या करण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पडेगाव परिसरातील कोमल नगर येथे उघडकीस आली. आरडाओरड झाल्याने नागरिकांनी प्रसंगावधान राखून आरोपी प्रियकराला पकडत चांगलाच चोप दिला. दरम्यान, आरोपी पत्नी मुलासह फरार झाली असून छावणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुरेश श्रीमंत खालापुरे (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी शीला सुरेश खालापुरे (वय ३६) व तिचा प्रियकर राजू भानुदास खैरे (रा. पैठण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश खालापुरे हे रिक्षाचालक असून ते कोमल नगरमध्ये पत्नी व मुलांसह वास्तव्यास आहेत. शीला ही एका खासगी कंपनीत काम करत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिचा संपर्क राजू खैरे याच्याशी वाढला आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास शीला हिने आपल्या पतीच्या हत्या करण्यासाठी प्रियकर राजूला घरात बोलावले. घराचा दरवाजा बंद करून, टीव्हीचा आवाज वाढवण्यात आला. नंतर शिलाने उशीने पतीचे तोंड दाबले तर राजूने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत सुरेश यांचा गळा आवळता आला नाही.
आरडाओरड ऐकून वरच्या मजल्यावरील घरमालक विशाल जाधव यांनी खाली येत नागरिकांना आवाज दिला. नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करत राजू खैरेला पकडले आणि चांगलाच चोप दिला. दरम्यान, शीला खालापुरे आपल्या नववर्षीय मुलासह पसार झाली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*