छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी फेसबुकवरील आकर्षक जाहिरात पाहून संपर्क साधणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं. झिरोधा ब्रोकिंगच्या नावाने बनावट अ‍ॅपद्वारे फसवणूक करून सायबर भामट्यांनी तब्बल ३४ लाख ८७ हजार ६७ रुपयांना गंडा घातला.

फिर्यादी मरियम नुसरत खान (वय ३५, रा. जिन्सी टॉवर) यांना ४ जुलै रोजी फेसबुक पाहत असताना झिरोधा शेअर मार्केटसंबंधी गुंतवणुकीची जाहिरात दिसली. त्यांनी त्यावर दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर संपर्क साधला. दुसऱ्या दिवशी “श्रुती शिंधवाणी” नावाच्या महिलेनं संपर्क साधत त्यांना “लुमीयेन मॅक्स” नावाचं अ‍ॅप डाउनलोड करून गुंतवणूक करण्यास सांगितलं.

सुरुवातीला ५ हजार आणि नंतर २० हजार रुपये गुंतवले असता थोडा नफा दाखवण्यात आला. यामुळे मरियम यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली गेली. यानंतर भामट्यांनी अॅपवर खोटा नफा दाखवून गुंतवणुकीचा आकडा ३४.८७ लाखांपर्यंत नेला.

गुंतवलेले पैसे काढण्याचा प्रयत्न करताच भामट्यांनी त्यांना १५ टक्के टॅक्स भरल्याशिवाय पैसे परत मिळणार नाहीत, असं सांगत आणखी ५ लाखांची मागणी केली. SEBI नंबरसह झिरोधा कंपनीचे बनावट कागद आणि विनिंग सर्टिफिकेटही पाठवण्यात आले.

हा प्रकार ४ ते २१ जुलैदरम्यान घडला असून सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. लोकांनी फेसबुक व सोशल मीडियावरून आलेल्या गुंतवणूक प्रस्तावांपासून सावध राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

818 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क