छत्रपती संभाजीनगर : शहरातून सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक आणि माजी नगरसेवक राजू तनवाणी यांचा मुलगा दिपेश तनवाणी (वय 26) याने स्वतःच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिपेश तनवाणी हे छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी असून, घटनेच्या दिवशी ते घरी एकटे होते. दुपारच्या सुमारास त्यांनी घरातील फॅनला गळफास घेऊन आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना दिपेशच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली. त्या नोटमध्ये “तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही” असे लिहिले असून, आत्महत्येचे नेमके कारण त्यात स्पष्ट करण्यात आलेले नाही. या नोटमुळे दिपेश मानसिक तणावाखाली होता का, याबाबत पोलिस तपास करत आहेत.
घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. घटनेनंतर तनवाणी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी सुसाईड नोटचा सखोल तपास सुरू केला आहे. दिपेशच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडूनही माहिती घेतली जात आहे. आत्महत्या करण्यामागील खरी कारणे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*