छत्रपती संभाजीनगर : शहरात सोमवारी घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. रिक्षाचालकाने प्रवासी महिलेला शिवीगाळ करून वाईट हेतूने स्पर्श केला, तिचा मोबाईल हिसकावला आणि हस्तक्षेप करणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली. युसूफ मोहंमद अली अन्सारी (रा. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला या राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागात कर्मचारी असून, त्या दररोज जालना येथून शहरात ये-जा करतात. घटनेच्या दिवशी त्या कार्यालयासमोरून रिक्षाने रेल्वे स्टेशन परिसरात उतरल्या. प्रवासाचे नियमित भाडे १० रुपये असल्याने त्यांनी तेवढीच रक्कम दिली. मात्र, आरोपीने “तू भिकारी आहेस का? मला २० रुपये दे” असे म्हणत महिलेला शिवीगाळ सुरू केली.

वाद वाढताच रिक्षाचालक महिलेवर धावून गेला. “तू आता पश्चात्ताप करशील” असे म्हणत त्याने वाईट हेतूने स्पर्श केला. त्यानंतर महिलेचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. गोंधळ ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. यावेळी वाहतूक पोलिस अंमलदार गिरी आणि राठोड घटनास्थळी पोहोचले. मात्र, आरोपीने पोलिसांनाही शिवीगाळ केली आणि धक्काबुक्की करत त्यांच्या हातातील ई-चलान मशीन ओढून खाली फेकून दिले.

नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला पकडून पोलिस ठाण्यात आणले. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

5,668 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क