छत्रपती संभाजीनगर : किल्लेअर्क परिसरात मध्यरात्री सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजा याने आपल्या मैत्रिणीवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली. राखी (२२, मूळ नांदेड) असे जखमी तरुणीचे नाव असून, गोळी तिच्या उजव्या हाताला लागली आहे. जखमी तरुणीला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तेजा फरार झाला असून, त्याचा शोध बेगमपुरा पोलिस व गुन्हे शाखा घेत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी तेजाने राखीला आपल्या घरी आणले होते. सोमवारी रात्री उशिरा दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. संतापाच्या भरात तेजाने पिस्तूल काढून गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणीला रुग्णालयात हलवले. रात्री उशिरा बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी तिचा जबाब नोंदवला. घटनेनंतर पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्त घटनास्थळी पोहोचले. गुन्हे शाखेने तेजाच्या घराची तपासणी केली, मात्र पिस्तूल मिळाले नाही.

तेजाचा गुन्हेगारी इतिहास

फैजल तेजा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर बलात्कार, चोरी, खुनाचा प्रयत्न यांसारखे १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे नोंद आहेत. एकेकाळी भुरट्या चोऱ्या करणारा तेजा, सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात आल्यानंतर गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला. २०२१ मध्ये त्याच्याच मैत्रिणीने त्याच्यावर बलात्काराचा व चाकूने हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. एप्रिल २०२५ मध्ये टिव्ही सेंटर चौकात रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला करून दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्याची धिंड काढली होती. मे महिन्यात त्याच्या सासुरवाडीत ड्रग्जचा व्यवसाय सुरू असल्याचे एनडीपीएस पथकाने उघड केले होते.

सध्या पोलिसांनी तेजाविरुद्ध हत्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही घटना गंभीर मानली जात असून, पोलिसांनी गुन्हेगाराच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,789 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क