छत्रपती संभाजीनगर : २२ कॅरेट सोन्यात चांदी मिसळून ते २४ कॅरेट म्हणून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेने केला आहे. ‘आशीर्वाद गोल्ड’ नावाने ऑफिस थाटून बसलेल्या या टोळीने नागरिकांना “९३ हजारांत १ तोळा सोने खरेदी करा आणि १ लाखांत विक्री करून ७ हजारांचा नफा कमवा” अशा आश्वासनांची जाहिरात व्हायरल करून फसवणुकीचा जाळा विणला होता.

गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये आनंदकुमार नामदेवराव मगरे (३७, नारळीबाग), दीपक गौतम आढावे (३१, हडको), जयपाल कन्हैयालाल धर्मानी (४९, काल्डा कॉर्नर) आणि रीलस्टार सुशील प्रभू वाघमारे (२४, उल्कानगरी) यांचा समावेश आहे. धर्मानीने मगरेला सोने विक्रीची कल्पना सांगितली. त्यासाठी मगरेने आढावेला सोबत घेतले आणि नारळीबाग येथील स्वतःच्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर ‘आशीर्वाद गोल्ड’चे ऑफिस सुरू केले.

त्यांची योजना अशी होती की, २४ कॅरेट सोने खरेदी करून त्यात चांदी मिसळून २२ कॅरेट बनवायचे आणि तेच २४ कॅरेट म्हणून ग्राहकांना विकायचे. २२ कॅरेट सोने ९१०० रुपये ग्रॅमला घेऊन ग्राहकांना ९३०० रुपयांना विक्री करायचे, तसेच ग्राहकाला विक्री करताना १०,००० रुपये ग्रॅमचा दर मिळेल असे सांगायचे, ज्यामुळे ग्राहकाला ७०० रुपये ग्रॅम नफा होईल असा भास निर्माण करायचा.

या संपूर्ण योजनेत सोन्याच्या कॅरेटबाबत खरी माहिती न देण्याचे ठरवले होते. जाहिरात व्हायरल होताच पीएसआय प्रवीण वाघ यांनी खात्री करून कारवाई केली आणि रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष म्हणजे, रीलस्टार सुशील वाघमारे याने फक्त ३ हजार रुपयांसाठी जाहिरात व्हिडिओ तयार करून व्हायरल केला. मात्र, हा व्हिडिओच फसवणुकीचा पुरावा ठरल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या टोळीने किती लोकांची फसवणूक केली याचा तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,903 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क