छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी म्हणजेच आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा परिसरातील खंडोबा कडेपठार येथे ट्रेकसाठी गेलेल्या तरुणांच्या गटाला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसला. अचानक समोर बिबट्या आल्याने ट्रेकर्स काही काळासाठी भांबावून गेले. त्यांनी तत्काळ वनविभागाला घटनेची माहिती दिली.

सूचना मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि गावकरी घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही. मात्र वन्यप्राण्यांच्या उपस्थितीमुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून खंडोबा कडेपठार आणि सातारा डोंगर परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच परिसरात पिंजरे लावण्याची आणि गस्त वाढवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी जंगलात जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे सोडू नये, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी कोणतीही हालचाल आढळल्यास तातडीने वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाने घटनास्थळावर लक्ष ठेवले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,399 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क