मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा लढाई उभारण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी एल्गार पुकारत मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सध्या मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा जुन्नरमध्ये दाखल झाला आहे. जुन्नर शहरातील वनविभागाच्या गेस्ट हाऊस येथे त्यांनी थोडी विश्रांती घेतली असून लवकरच किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होणार आहेत. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीची माती कपाळी लावून आरक्षणाच्या लढ्याचा संकल्प करण्याची परंपरा ते या वेळीही पाळणार आहेत.

जुन्नरमध्ये जरांगेंच्या स्वागतासाठी हजारो मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. किल्ले शिवनेरीजवळ मराठा बांधव मोठ्या संख्येने जमले आहेत. यावेळी मोर्चामध्ये उत्साहाचे वातावरण असून राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळाची भेट मात्र होणार नसल्याचे समजते.

या मोर्च्याचा प्रवास जुन्नरमध्ये येण्यापूर्वी अहिल्यानगर शहरातही जोरदार स्वागत करण्यात आले. शेंडी गावात ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांचे स्वागत जल्लोषात केले. जेसीबीवरून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि जयघोष करत अहिल्यानगर शहरात मोर्चाचे स्वागत करण्यात आले. रात्री १२ वाजता पावसातही हजारो ग्रामस्थांनी या स्वागतात सहभाग घेतला.

आता जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवर संकल्प करून मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि आझाद मैदानावर आरक्षणासाठी आपला आवाज बुलंद करतील. या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,966 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क