मराठा आरक्षणासाठी जोरदार लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज (29 ऑगस्ट) मुंबईत दाखल झाले असून मानखुर्द आणि चेंबूर परिसरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत पोहोचलेल्या जरांगेंनी आझाद मैदानावर ठिय्या मांडणार आहे. सकाळपासूनच आंदोलकांचा उत्साह पाहता मैदान पूर्णपणे गच्च भरले आहे.

सरकारकडून आज केवळ एका दिवसासाठीच आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिली आहे. त्यामुळे संध्याकाळी सहा नंतर जरांगे कोणती भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नाही. त्यामुळे उद्या आणि परवा जरांगे व आंदोलकांचा मुक्काम कुठे असणार हा मोठा प्रश्न आहे.

मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले की, “मराठा कुणबी एक आहेत, याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा आम्ही मुंबई सोडणार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा, बॉम्बे गॅझेटियर लागू करावे. तसेच सगे सोयरे अध्यादेशाचा पुनर्विचार करावा आणि योग्य व्याख्येनुसार त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.

याशिवाय, “सरसकट गुन्हे मागे घ्यायचे होते, पण अजूनही केसेस बाकी आहेत. आमच्यावरच मार खाल्ल्यानंतरही गुन्हे आमच्यावरच आहेत. आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांची अवस्था बिकट आहे,” असे जरांगे म्हणाले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “आम्हाला कायद्यात बसणारं आरक्षण द्या, अन्यथा लढा सुरूच राहील.”

सरकारकडून पुढील हालचालींची सर्वांनाच उत्सुकता आहे. आज संध्याकाळनंतर आंदोलनाची दिशा ठरणार असून, पुढील काही दिवस मुंबईत मराठा आंदोलनाची उष्णता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

860 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क