राज्य सरकारच्या दिव्यांगांसाठीच्या योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी दिव्यांगांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केल्या. यानंतर बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी यांना रिक्षांची पाहणी करण्यासाठी बोलावले. मात्र, कंपनीने पाहणीसाठी माहिती नसलेला कर्मचारी पाठवल्यामुळे बच्चू कडू यांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आणि त्याला कानाखाली लगावली.
https://youtube.com/shorts/kFscR6RnBTM?si=s-fi4TxXBkH1Rt0J
बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत कंपनीच्या प्रतिनिधीला विचारले, “तुला काही माहितीच नाही, तर इथे आला कशाला?” यावेळी त्यांनी उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनाही फटकारले. बच्चू कडू यांच्या मते, जवळपास ५०० रिक्षांचे वाटप करण्यात आले आहे, त्यापैकी २५० ते ३०० रिक्षा या खराब स्थितीत आहेत.
कंपनीचा हा कर्मचारी अधिकारी नसून एक साधा कर्मचारी असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. त्यांनी नादुरुस्त इ-रिक्षा परत घेण्याचे निर्देश दिले असून, राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करेल, असे दिव्यांग विभागाचे अधिकारी म्हणाले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*