छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांत मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. चोरटे महागडे मोबाइल चोरून ते राजस्थान, बिहार, मध्यप्रदेश अशा बाहेरील राज्यांत स्वस्त दरात विक्री करत होते. खरेदीदार स्वस्त सौदा समजून मोबाइल घेत असल्याने बिलाची मागणी करत नव्हते. मात्र, केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (सीईआयआर) पोर्टलमुळे हा डाव फसला. या प्रणालीच्या मदतीने पोलिसांनी तब्बल ३ लाख ९८ हजार रुपये किमतीचे १५ महागडे मोबाइल हस्तगत केले असून, ते गुरुवारी सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.

ही कारवाई निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार मारोती गोरे यांच्या पथकाने केली. तपासात असे आढळले की, चोरीचे मोबाइल राज्याबाहेर स्वस्त विकले जात होते. मात्र, सीईआयआर पोर्टलवर तक्रारी नोंदवल्यानंतर संबंधित मोबाइलवर दुसरे सिमकार्ड टाकले की तो आपोआप ब्लॉक होतो. त्याच वेळी पोलिसांना संबंधित माहिती मिळते. त्यानुसार पोलिसांकडून सिम धारकांशी संपर्क साधून मोबाइल गुन्ह्यातील असल्यास परत करण्याची सूचना केली जाते. अशा प्रकारे जवाहरनगर पोलिसांनी कसून तपास करून हे १५ मोबाइल हस्तगत केले.

सीईआयआर म्हणजे (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) ही केंद्र सरकारची ऑनलाइन सुविधा आहे. कोणताही मोबाइल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास नागरिक त्याचा IMEI क्रमांक या पोर्टलवर नोंदवू शकतात. त्यानंतर तो मोबाइल दुसऱ्या सिमसह सुरू होताच तो तात्काळ ब्लॉक होतो आणि संबंधित पोलिस ठाण्याला माहिती मिळते. या सुविधेमुळे चोरट्यांचे हाल होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

गुरुवारी आयोजित कार्यक्रमात चोरीला गेलेले मोबाइल मालकांना परत करताना एसीपी मनीष कल्याणकर यांनी सांगितले की, “सीईआयआर प्रणालीमुळे मोबाइल चोरीच्या घटना रोखण्यात आणि मालकांना त्यांचा हक्काचा मोबाइल परत मिळवून देण्यात पोलिसांना मोठी मदत होत आहे. नागरिकांनी देखील मोबाइल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्वरित पोर्टलवर तक्रार नोंदवावी.”

या कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणता येऊ शकते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

856 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क