छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक करून तब्बल ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई २० सप्टेंबर रोजी करण्यात आली.

अटक आरोपींची नावे योगेश कैलास गाडेकर (२६, रा. जाधववाडी) आणि मुबारक युनुस शेख (२५, रा. मोहदरी, नायगाव, सावंगी) अशी आहेत. मुख्य आरोपी योगेश याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून त्याच्यावर यापूर्वीही वडोदबाजार व पैठण येथे गुन्हे दाखल आहेत.

योगेश हा इग्निशन स्विच खराब असलेल्या दुचाकीचाच शोध घेत असे. तो एका घासलेल्या चावीचा वापर करून काही सेकंदांतच गाडी सुरू करून पळ काढत असे. चोरी केलेल्या दुचाकी तो आपल्या साथीदार मुबारक शेखला कमी दरात विकत असे.

सुरुवातीला पोलिसांनी विचारले असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मुबारकच्या गावातून ४ तर योगेशच्या साथीदाराच्या मामाच्या शेतातून तब्बल १० अशा एकूण १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे सिडको पोलिस ठाण्यात दाखल असलेले ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुभाष शेवाळे, हवालदार मंगेश पवार, प्रदीप दंडवते यांच्या पथकाने केली.

ग्रामीण भागात विक्री

तपासात उघडकीस आले की हे आरोपी शहरी भागातून दुचाकी चोरून ग्रामीण भागांमध्ये १० ते १५ हजार रुपयांना विकत होते. १८ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी जाधववाडी मोंढा परिसरात चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून योगेश गाडेकर आणि मुबारक शेख यांना ताब्यात घेतले.

नागरिकांसाठी धडा

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की दुचाकी नेहमी वर्दळीच्या ठिकाणी किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली पार्क करावी. फक्त इग्निशन लॉकवर अवलंबून न राहता व्हील लॉक किंवा साखळीचा वापर करावा. गाडीत कधीही मूळ कागदपत्रे ठेवू नयेत आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.

सिडको पोलिसांच्या या कारवाईमुळे दुचाकी चोरी करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच आळा बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,496 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क