छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणानिमित्त शहराबाहेरील चाकरमाने आपल्या गावी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष नियोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वच आगारांतून १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एकूण ३२ जादा बस सेवा देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.

शाळांच्या परीक्षा बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी संपत असल्याने त्या दिवसापासून प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाहेरील प्रवासी मोठ्या संख्येने आपल्या गावी जाणार असल्यामुळे, या वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून लांब पल्ल्याच्या आणि गर्दीच्या मार्गांवर जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या विशेष सेवेत नागपूर, अकोला, लातूर, पुणे, बुलढाणा, जळगाव, भुसावळ, नाशिक, धुळे, शिर्डी आदी प्रमुख मार्गांचा समावेश आहे. या बस प्रवाशांना सुटसुटीत आणि वेळेवर प्रवासाची सुविधा देतील.

तसेच, चिंचवड परिसरातील विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील तरुणांच्या सोयीसाठी १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान २० जादा बस सेवा देण्यात येणार आहेत. परिस्थितीनुसार या बससेवेत आणखी वाढ करण्याची शक्यता असल्याचेही घाणे यांनी सांगितले. या सर्व बस नियमित वाहतुकीव्यतिरिक्त अतिरिक्त म्हणून चालवण्यात येणार आहेत.

दिवाळी दरम्यान या बससेवा एकूण १४ हजार ५३८ किलोमीटर अंतरावर प्रवाशांना सेवा देणार आहेत. वाढत्या प्रवासी गर्दीचा भार कमी करण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासाची खात्री करण्यासाठी एसटी प्रशासनाचे हे पाऊल स्वागतार्ह ठरत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

607 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क