छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांची विक्री जोरात सुरू झाली असताना, अनेक ठिकाणी परवानगीशिवाय फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. २०) छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर धडक कारवाई करत मोठा बंदोबस्त उभारला. संध्याकाळपासून मोंढा नाका परिसरात सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापेमारी केली. या कारवाईदरम्यान रस्त्याच्या कडेला, दुकानाबाहेर किंवा पादचारी मार्गावर टेबल, पलंग टाकून सुरू असलेले फटाका विक्री स्टॉल हटविण्यात आले. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला तर अनधिकृत विक्रेत्यांना कठोर इशारा देण्यात आला.

रहिवासी भागात किंवा गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांची विक्री केल्यास मोठ्या दुर्घटनेचा धोका संभवतो. त्यामुळे पोलिसांनी आता शहरातील विविध भागांत तपासणी मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः जुना मोंढा, सिडको, टीव्ही सेंटर, गुलमंडी, आणि सिटी चौक या भागांत नियमित गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परवानगी नसलेले कोणतेही स्टॉल सुरू असल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे की, धोकादायक ठिकाणी फटाके विक्री अथवा साठा होत असल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी. यामुळे अपघात टाळण्यास मदत होईल आणि सण आनंदात पार पाडता येईल. फटाके विक्रीसाठी अग्निशमन दल आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई दिवाळीच्या काळात सातत्याने सुरू राहणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,013 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क