मुंबई : मराठवाडा पदवीधर मतदार संघ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षविस्ताराचा वेग वाढविला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेस पदाधिकारी आणि सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मधुकर किसनराव देशमुख यांनी बुधवारी (दि. २९) शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी ओबीसी कल्याण आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, अनिल मकरिये आणि प्रा. डॉ. पांडुरंग मांडकीकर उपस्थित होते. देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या शिक्षण क्षेत्रातील पकड आणखी मजबूत झाल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, “मधुकर देशमुख हे शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व दूरदर्शी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिक्षक नेते, संस्थाचालक आणि निवृत्त अधिकारी लवकरच भाजपमध्ये सहभागी होतील.” त्यांनी पुढे सांगितले की, “देशमुख यांच्या सहभागामुळे मराठवाडा पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीत भाजपला नवचैतन्य मिळेल. ते आमदार संजय केणेकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पक्ष बळकट करतील.”

या कार्यक्रमात देशमुख यांच्यासोबत अनेक मान्यवरांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात निवृत्त उपसंचालक भाऊसाहेब तुपे पाटील, जालन्यातील माजी शिक्षणाधिकारी रमेश तांगडे पाटील, हिंगोलीचे माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, नांदेडचे उपशिक्षणाधिकारी व्यंकटेश कोमटवार, शिक्षण क्रांती संघटनेचे प्रा. मनोज पाटील, आबासाहेब जगताप आंवरगावकर, शिवाजी देवरे पाटील, निवृत्त प्राचार्य रामनाथ पंडुरे आणि प्राचार्य अभिलाष सोनवणे यांचा समावेश आहे.

या प्रवेशामुळे मराठवाडा पदवीधर मतदार संघात भाजपची ताकद अधिक वाढली असून आमदार संजय केणेकर आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासोबत आता मधुकर देशमुख यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला याचा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

638 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क