राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. दोन्ही महिन्यांचा हफ्ता महिलांच्या खात्यात लवकरच वर्ग होणार आहे. मात्र, या योजनेमुळे तृतीयपंथी समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना, टीव्ही सेंटर मैदानावर त्यांच्या भाषणादरम्यान काही तृतीयपंथी व्यक्ती उपस्थित होत्या. भाषण संपताच त्यांनी आपल्या तक्रारींनी गजबजून आक्रोश केला. यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.
“आम्हाला समाजाने नाकारले आहे, शहरात आमचं जीवन अवघड झालंय. आम्ही जगायचं कसं? सरकारने आम्हाला नोकऱ्या द्याव्यात,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
तृतीयपंथी समाजाच्या या आक्रोशाने प्रशासनाच्या ध्यानात या समुदायाच्या समस्यांचे गांभीर्य आणून दिले आहे. या घटनेने तृतीयपंथी समाजाच्या अस्तित्वाच्या संघर्षाकडे लक्ष वेधले आहे, आणि आता त्यांच्या मागण्या पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*