राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. “मनोज जरांगे पाटील आणि माझं उद्दिष्ट एकच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे राज्यात एक नवीन राजकीय आघाडी निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनसंवाद जागृती यात्रेची आज सांगता झाली. या यात्रेनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत उतरायचे की नाही, याचा निर्णय ते 29 ऑगस्टला घेणार आहेत. यासाठी त्यांनी मराठा समाजाला आंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, “मनोज जरांगे पाटील यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नाही, मात्र ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.” त्यांनी असेही सांगितले की, “शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी ते घटनेत समाविष्ट केलं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना माझा नेहमीच पाठींबा राहिला आहे.”
या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, आणि या संभाव्य आघाडीमुळे निवडणूक प्रचारात मोठे बदल होऊ शकतात.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*