शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार संजय शिरसाट यांच्यातील वाद आता उफाळून आला आहे. संजय राऊत यांनी ‘नमक हराम 2’ चित्रपट काढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संजय शिरसाट यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिरसाट यांनी खोचकपणे म्हटले, “तुम्ही काय चित्रपट काढता? ‘दलाल नं 1’ हा चित्रपट मीच तुमच्यासाठी काढणार आहे!”

शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. ते पुढे म्हणाले, “संजय राऊत यांनी मराठी असण्याचा दावा सोडला आहे. ते आता मराठी राहिलेलेच नाहीत.”

राऊत यांच्या दोन महिन्यांच्या प्रतीक्षेच्या सूचनेवर बोलताना शिरसाट म्हणाले, “दोन नाही, तर त्यांनी त्या पुढे 0 लावावा, म्हणजे 20 वर्षे होतील! त्यांचे विधान म्हणजे फक्त कार्यकर्त्यांना फसवण्याचा प्रयत्न आहे.”

शिरसाट यांची ही टीका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे, आणि या वादाला आणखी किती उंची मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,016 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क