छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह नारावाडी शिवारातील नळकांडी पुलाजवळ आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, हदियाबाद–नारवाडी मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट झाडीत गणेश टेमकर यांचा मृतदेह स्थानिकांना दिसून आला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूला किती तास किंवा दिवस लोटले हे अंदाजणे कठीण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

गणेश टेमकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक तपासात घटनास्थळी संशयास्पद परिस्थिती दिसून येत असल्याने ही हत्या आहे की आत्महत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. राजकीय व्यक्तिमत्त्वाचा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झाल्याने या घटनेने संभाजीनगर जिल्ह्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक आणि पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही या घटनेबाबत मोठी चर्चा रंगत आहे.

गणेश टेमकर हे आपल्या परिसरात सक्रिय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. दरम्यान, गंगापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,673 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क