छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत गंभीर आणि टेन्शन वाढवणारी घटना समोर आली आहे. शहरातील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून एक महिला राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या महिलेचे नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५) असे असून ती या हॉटेलमध्ये नेमकी कोणत्या कारणासाठी वास्तव्यास आहे, याबाबत संशय निर्माण झाला होता.

विशेष म्हणजे या महिलेचे स्वतःचे घर केवळ १० किलोमीटर अंतरावर पडेगाव येथे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून हॉटेलमध्ये राहण्याचे कारण काय? हा प्रश्न अधिकच गंभीर ठरला. सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे हॉटेलवर छापा टाकत खोलीची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. तिच्या बॅगेत २०१७ च्या यूपीएससी निवड यादीची प्रत सापडली ज्यात तिचे नाव ३३३ व्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख होता. मात्र कागदपत्रे तपासताना तिच्या आधारकार्डावर फेरफार झाल्याचेही उघड झाले.

यामुळे पोलिसांचा संशय अधिकच गडद झाला. प्राथमिक चौकशीत महिला कोणतीही ठोस माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देत होती. पुढील चौकशीत तिच्या बँक खात्यांमधून अफगाणिस्तानातील अशरफ खलील आणि पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यांतून पैसे जमा झाल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय या दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या प्रयत्नांबाबतचे फोटो तिच्या मोबाइलमध्ये आढळले.

हे सर्व प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संशयास्पद ठरत असल्याने महाराष्ट्र अँटी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस) आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)कडून महिलेची कसून चौकशी केली जात आहे.

शनिवारी, २२ नोव्हेंबरला मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी महिलेवर गुप्तचर नेटवर्क किंवा आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणाचा विस्तार कुठपर्यंत जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,112 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क