छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून पवारांच्या बारामतीतील विकासाचा आदर्श संभाजीनगरात राबवण्याचा दावा करण्यात आला आहे. “बारामतीचा विकास पॅटर्न संभाजीनगरात” अशा आशयाचे बॅनर शहरातील प्रमुख चौक, रस्ते व वर्दळीच्या ठिकाणी झळकताना दिसत आहेत.

बॅनरमध्ये छत्रपती संभाजीनगर हे बारामतीच्या तुलनेत विकासात मागे असल्याचा उल्लेख करत, मराठवाड्याच्या राजधानीला बारामतीसारखा सर्वांगीण विकास देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच औद्योगिक विकास या बाबतीत बारामतीचा आदर्श घ्यावा, असा संदेश या बॅनरद्वारे देण्यात येत आहे.

या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे चिन्ह तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो ठळकपणे लावण्यात आला आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या बॅनरबाजीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विरोधकांकडून यावर टीका होण्याची शक्यता असतानाच, राष्ट्रवादीकडून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचे संकेत या बॅनरमधून देण्यात आले आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

661 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क