छत्रपती संभाजीनगर : शहरात सोन्याच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच दुसरीकडे भर रस्त्यात महिलांना व वृद्धांना लक्ष्य करून लुटमारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. १३ फेब्रुवारी रोजी अवघ्या एका तासात तीन महिलांच्या सुमारे चार तोळ्यांच्या सोनसाखळ्या हिसकावून नेण्यात आल्या, तर सकाळी मदतीच्या बहाण्याने एका वृद्ध महिलेचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली. गेल्या वर्षी केवळ सोनसाखळी लुटीच्या ८० हून अधिक घटना घडल्या होत्या. यंदाही हे सत्र सुरू असून अद्याप एकाही घटनेचा छडा लागलेला नाही.

विटखेड्यात राहणाऱ्या ६१ वर्षीय शोभा पुजारी या मैत्रीण माधुरी वैद्य यांच्यासोबत पैठण रस्त्यावरील अग्रसेन शाळेमागील परिसरात सायंकाळी फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण हिसकावून पलायन केले. दोघांनी चेहरा झाकलेला होता व बराच वेळ परिसरात रेकी करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

याच दिवशी जवाहरनगर व उस्मानपुरा परिसरातही अशीच घटना घडली. ७८ वर्षीय निवृत्त शिक्षिका मिना देशमुख या काल्डा कॉर्नरजवळ पायी फिरत असताना एका व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.

दरम्यान, सकाळी ६५ वर्षीय गिरीजा रोकडे यांना साडी व पैसे देण्याचे आमिष दाखवून दागिने काढायला लावले आणि हातचलाखीने सोन्याची पोत, कानातले तसेच साडेसात हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली.

या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लुटारूंना लवकरात लवकर अटक करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

674 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क