छत्रपती संभाजीनगर : शहरात मंगळसूत्र चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून सलग दोन दिवसांत घडलेल्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्कानगरीत मंगळवारी सायंकाळी आणि एन-२ परिसरात बुधवारी सकाळी अशा दोन घटना घडल्या. मागील तीन महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या जवळपास ३० घटना समोर आल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

उलकानगरमधील हिरण्यनगर भागात राहणाऱ्या अलका वसंतराव माळी (६०) यांचे काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन झाले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या मंगळवारी सायंकाळी मैत्रिणीसोबत फेरफटका मारत होत्या. साडेसातच्या सुमारास त्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेजवळ पोहोचल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावले आणि पळ काढला. अचानक झालेल्या हिसक्यामुळे अलका माळी खाली पडल्या. नुकतेच ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना तोल सावरता आला नाही आणि त्या पुन्हा जखमी झाल्या. या घटनेप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसरी घटना बुधवारी सकाळी एन-२ सिडको परिसरात घडली. गंगुबाई अशोक काळे (५५) या दररोजप्रमाणे मॉर्निंग वॉक करून सकाळी सहाच्या सुमारास घरी परतत होत्या. न्यू एसटी कॉलनीजवळील रस्त्यावरून जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १९ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. या वेळी त्यांच्या मानेला जोराचा झटका बसला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शहरात वाढत्या हिसकावणीच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/E8LjDsy4JpoKzFHBA67enK?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

504 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क