छत्रपती संभाजीनगर : शहरातील पुंडलिकनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत चांदीची मूर्ती व रोख रक्कम असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्पा प्रकाश चव्हाण या आपल्या मुलगी मोनिका हिच्यासह राहतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उकाड्यापासून बचाव करण्यासाठी त्या दि. ५ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घराच्या गेट व मुख्य दरवाजाला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, दि. ६ मे रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा प्रेम प्रकाश चव्हाण हा घरी आला असता, घराच्या गेटला कुलूप व्यवस्थित होते. मात्र मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत खाली पडलेले दिसून आले.

यानंतर त्याने आई व बहिणीला उठवून खाली आणले. घरात पाहणी केली असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाट उघडे होते तसेच देवघरात ठेवलेली अंदाजे ३० ग्रॅम वजनाची चांदीची मूर्ती व त्यावरील चांदीची छत्री गायब असल्याचे निदर्शनास आले. तसेच ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेल्या पर्समधील ५ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरीस गेल्याचे आढळून आले.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये २० हजार रुपये किमतीची चांदीची मूर्ती व ५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

786 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क