छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात शुक्रवारी एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला असून, नातेवाईकाच्या हळदी समारंभाला जात असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातात तिचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तेजल काकासाहेब प्रधान (वय १७, रा. आंबेलोहोळ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिचे वडील काकासाहेब गिरजाबा प्रधान (वय ४६) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काकासाहेब प्रधान हे मुलगी तेजलसह दुचाकीवरून बगडी येथे नातेवाईकाच्या हळदी कार्यक्रमासाठी निघाले होते. संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ढोरेगाव शिवारातील शिवना नदीच्या पुलाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करत दोघांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तेजलला मृत घोषित केले. वडील काकासाहेब यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

तेजल ही अत्यंत बुद्धिमान व अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. तिने जिल्हा परिषद शाळेतून दहावीची परीक्षा ९४ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली होती. गुरुवारीच तिचा प्रथम वर्षाचा शेवटचा पेपर संपला होता. परीक्षेचा आनंद साजरा करण्याआधीच काळाने तिच्यावर झडप घातल्याने कुटुंबासह संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

795 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क