वाळूज महानगर :  भररस्त्यात स्कुटी अडवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.११) सायंकाळी वाळूज महानगर परिसरात घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना संभाजी गायकवाड (वय ४३, रा. सितानगर, बजाजनगर) या सोमवारी सायंकाळी आपल्या मुलीसह तिसगाव येथील बहिणीच्या घरून स्कुटीवरून घरी परतत होत्या. सायंकाळी सुमारे ८.१८ वाजेच्या दरम्यान त्या सिडको महानगर परिसरातील हॉटेल कंदिलजवळ पोहोचल्या असता समोरून आलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी त्यांची स्कुटी आडवी लावून अडवली.

यानंतर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या पांढऱ्या रंगाची हुडी घातलेल्या चोरट्याने वंदना गायकवाड यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण आणि काळी पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्या स्कुटीसह खाली पडल्या. त्यानंतर दोन्ही चोरटे मोहटादेवी मंदिराच्या दिशेने वेगाने पसार झाले.

या घटनेत १६ ग्रॅम वजनाचे ७१ हजार ४४७ रुपये किमतीचे सोन्याचे गंठण तसेच ६ ग्रॅम वजनाची ३१ हजार ७३१ रुपये किमतीची काळी पोत असा एकूण १ लाख ३ हजार ४७८ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली.

या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे पुढील तपास करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,497 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क